नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दशकात राजकीय पटलावर निराशा वाढताना दिसतेय. नाशिककर नेहमीच धक्कादायक निकाल देत असतात, मात्र यावेळी ब-यात मतदारांनी उमेदवारांना नाकारत मतदानावेळी नोटाचा अधिकार वापरला.
सात हजारहून अधिक नागरिकांनी यावेळी नोटाचा वापर केला. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक 13, 14, 15 मध्ये सात हजाराहून अधिक मतदारांनी राजकीय लोकांना नाकारलंय. प्रभाग 13 मधून सर्वाधिक 3 हजार 65, प्रभाग 14 मधून 2 हजार 201 आणि प्रभाग क्रमांक 15 मधून 1 हजार 174 मतदारांचा समावेश आहे.