'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर...

मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी... एक्सप्रेसवेवरचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे.

Updated: Feb 6, 2015, 09:02 AM IST
'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर... title=

मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी... एक्सप्रेसवेवरचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे.

एक्सप्रेसवेवर खालापूर टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालापूर टोलनाक्याचा सहा पदरी रस्ता आता चौदा पदरी करण्यात येणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलीय. हा रस्ता चौपदरी झाल्यानंतर एक्सप्रेसवेवरचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.