मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीत मुसलमानांना आता पाच टक्के आरक्षण मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालंय.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं नोकरीमध्ये मुसलमानांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. याचबाबत बुधवारी, ही घोषणा रद्द करण्यात आल्याचं फडणवीस सरकारनं जाहीर केलंय.
महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार, मुसलमानांना आरक्षण देणारा अध्यादेश गेल्या 23 डिसेंबरपासूनच निष्प्रभावी झालाय. या तथ्यावर विचार करताना गेल्या वर्षी 24 जुलै रोजी संबंधित सरकारी संकल्प रद्द केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.