नागपूर : प्रतापनगरमध्ये पोलीस स्टेशनाच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजलीय.
सुरेश डे आणि पंडित उर्फ कुलदीप तिवारी अशी दोन मृतांची नावं आहेत. पाच जणांनी मिळून दगडानं ठेचून यां दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त होतेय.
या दोन्ही हत्या टोळी युद्धांतूनच झाल्या असाव्यात असं पोलिसांचा कयास आहे. याप्रकरणी पाचही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यापैकी चार जण अल्पवयीन असल्याचं पुढे आलंय.