नागपूर : सलग दुसऱ्या वर्षी नागपूरचा संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. 500 आणि हजार रुपयाच्या नोटाबंदीमुळे संत्राउत्पादकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
एकिकडे 500 आणि 1,000च्या नोटा रद्द झाल्याने आणि बँकेतून पैसे काढण्यावर आलेल्या मर्यादेमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना देण्याकरिता पैसे नाही, अशा कात्रीत संत्रा उत्पादक सापडला आहे. 25 हजरा ते 40 हजार रुपये टन दराने विकल्या जाणाऱ्या संत्र्याची किंमत आता 15 हजार ते 25 हजारापर्यंत खाली आली आहे.
दरवर्षी या काळात सुमारे 300 वाहने भरून संत्री या मंडीत येतात, मात्र आता येथे येणाऱ्या वाहनांची संख्या 150पर्यंत खाली गेली आहे. चलन रद्द करण्याच्या निर्णयामुळे संत्र खरेदी करण्याकरिता बाहेरच्या गावातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची सांख्या देखील रोडावली आहे.