...जेव्हा बैठकीत अधिकारी 'कॅन्डी क्रश' खेळतात!

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मिटिंग आयोजित करण्यात आलीय... तीदेखील मुख्य सचिवांनी बोलावलेली मिटिंग... त्यामुळं खूप गांभीर्यानं चर्चा झाली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबातच घडलेलं नाही. 

Updated: May 29, 2015, 09:31 PM IST
...जेव्हा बैठकीत अधिकारी 'कॅन्डी क्रश' खेळतात! title=

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मिटिंग आयोजित करण्यात आलीय... तीदेखील मुख्य सचिवांनी बोलावलेली मिटिंग... त्यामुळं खूप गांभीर्यानं चर्चा झाली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबातच घडलेलं नाही. 

मुख्य सचिवांनी बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत सरकारी अधिकारी चक्क आपल्या मोबाईल फोनवर कँडीक्रश गेम खेळत होते. कुणी डुलकी मारत होता, तर कुणी भर मिटींगमध्ये मोबाईलवर बोलण्यात दंग होतं. 

नाशिकमध्ये जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या कुंभमेळाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय कालपासून नाशिक दौऱ्यावर आलेत. 

गुरुवारी त्रंबकेश्वर आणि शुक्रवारी सकाळी नाशिकमधील कामांची पहाणी केल्यानंतर सकाळी अकरा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. 

मात्र, या बैठकीत महिला अधिकारी मोबाईल गेम खेळण्यात रमल्या होत्या. तर एवढ्या महत्त्वाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निवांत डुलकी कशी लागते, हे कोडंच आहे. यावरून आता कुंभमेळ्यासाठी सरकारी यंत्रणा किती सज्ज आहे, याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.