पिंपरी-चिंचवड : पासपोर्ट काढण्यासाठी जवळपास 20 किलोमीटर पुण्याला जायचा पिंपरी चिंचवडकरांचा त्रास आता बंद झाला आहे. आता शहरातच पासपोर्ट कार्यालय सुरु झालंय.
खराळवाडी मधल्या पोस्ट ऑफिस मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आलं. बारणे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं.