पुणेकरांना दिवाळीभेट, मिळणार वाढीव FSI

 पुणेकरांना वाढीव FSIची दिवाळीभेट मिळाली आहे. विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पुणे शहरातील नवीन विकास नियंत्रण नियमावली शासनाला पाठवली आहे. त्यात म्हाडा आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं उभारणीसाठी चार FSIची शिफारस करण्यात आली आहे.

Updated: Nov 11, 2015, 09:56 AM IST
पुणेकरांना दिवाळीभेट, मिळणार वाढीव FSI  title=

पुणे : पुणेकरांना वाढीव FSIची दिवाळीभेट मिळाली आहे. विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पुणे शहरातील नवीन विकास नियंत्रण नियमावली शासनाला पाठवली आहे. त्यात म्हाडा आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं उभारणीसाठी चार FSIची शिफारस करण्यात आली आहे.

शहराच्या जुन्या हद्दीत री डेव्हलपमेंट आणि क्लस्टर डेव्हलपमेंसाठी देखील आधीपेक्षा दुप्पट FSIची तरदूद तर शहराच्या जुन्य हद्दीत तिप्पट आणि नव्या हद्दीत अडीचपट TDRजागा मालकांना दिला जाणार आहे. बस डेपो, बस टर्मिनल अशा वाहतूक व्यवस्थेसाठी करण्यात येणा-या बांधकामाला FSIची अट लागू रहाणार नाही.

चोकलींगम यांच्या समितीनं यापूर्वीच पुण्याचा विकास आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता विकास नियंत्रण नियमावली देखील सादर करण्यात आली आहे. त्यामुळे विकास आराखड्याचा चेंडू राज्य सरकारच्य कोर्टात आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.