शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करणार : मुख्यमंत्री

रायगडावर शिवछत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 01:57 PM IST
शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करणार : मुख्यमंत्री title=
संग्रहित फोटो

अलिबाग : रायगडावर शिवछत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात 10 महापालिकांपैकी 8 ठिकाणी तर जिल्हा परिषदांमध्ये चांगले यश मिळाले. भाजपच्या या विजयानंतर मुख्यमंत्री हे मंत्र्यांसमवेत आज रायगडावर शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. 

महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे छत्रपतींचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या  सिंहासनाधीष्ठीत पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले.