कैद्यांच्या मोबाईल वापराला चाप, तुरुंगात आता मोबाईल जॅमर्स

राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये मोबाईल जॅमर्सची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 11:46 AM IST
कैद्यांच्या मोबाईल वापराला चाप, तुरुंगात आता मोबाईल जॅमर्स title=

नाशिक : राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये मोबाईल जॅमर्सची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. 

राज्यातल्या अनेक जेलमध्ये कमी-अधिक प्रमाणात चालणाऱ्या कॉल सेंटर्सना यामुळे चाप लागणार आहे. नाशिक कारागृहात कैद्यांकडे मोठ्या संख्येनं मोबाईल असल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केला होता. त्यानंतर सरकारला जाग आली असून मोबाईल जॅमर्स बसवण्याची सुरूवातही नाशिकपासूनच होणार आहे. 

नाशिक मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त जॅमर्स बसण्याची तयारी प्रशासनानं सुरू केलीये. तुरुंग महानिरीक्षक उपाध्यय यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकनंतर मुंबईच्या ऑर्थर रोड, नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात  टप्प्याटप्प्यानं जॅमर्स बसवले जातील.