मुंबई : गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.
राज्यातल्या पाणीसाठ्यांची स्थिती काय आहे ते पाहूयात...
विभाग - वर्ष २०१४ - वर्ष २०१५
अधिक वाचा - राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला
मराठवाड्यामध्ये परतीचा पाऊस बरसत आहे. गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात ११.८ मिलीमीटर पाऊस झाला. तर सर्वात कमी पाऊस नांदेड जिल्ह्यात ०.२२ मिलीमीटर इतका झाला. काही जिल्ह्यांत पाऊस चांगला झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र काही वाढ झालेली नाही. मराठवाड्यात अजूनही फक्त ८ टक्केच पाणीसाठा आहे.. तर उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी छोट्या नदी नाल्यांना काही प्रमाणात पाणी आलं आहे.
मराठवाड्यातल्या विविध धरणांची स्थिती सध्या काय आहे पाहूयात...
धरण - जिल्हा - पाणीसाठी
दरम्यान, उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या वतीनं दुष्काळाग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली गेली. यावेळी जिल्ह्यातल्या एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची रक्कम मदत स्वरुपात दिली गेली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्चही शिवसेना करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या फोटोंच्या प्रदर्शनामधून जमा झालेल्या रकमेतून उस्मानाबादमधल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत करण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि इतर शिवसेना नेते यावेळी हजर होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.