नागपूर : जुलै महिना सुमारे पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आज नागपुरात पावसाने कमबॅक केले आहे. तसेच मराठवाड़ा मध्ये सर्व दूर हजेरी लावली आहे. जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर, संपूर्ण जुलैमध्ये हलक्या सरींचा अपवाद वगळता वरूणराजाने विदर्भाकडे पाठच फिरवली होती. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावली असून, आणखी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.
काल संध्याकाळपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही पाऊस परतला असून, अद्यापही पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाचा धान उत्पादक शेतक-यांना फायदा झाला असुन, हवामान खात्याच्या अंदाजानुसार भंडारा जिल्यात सर्वाधिक पाऊस पवनी व लाखांदूर तालुक्यात झाला आहे. येते काही दिवस अशीच रिमझिम पावसाची संततधार राहणार असल्याने विदर्भातील शेतक-यांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
वरुण राजाने मात्र आज मराठवाड़ा मध्ये सर्व दूर हजेरी लावली आहे. हलका पाऊस सुरु आहे. त्यात ढगाळ वातावरण असल्याने हा प्रयोग आज किंवा उद्या केला तर चांगला फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मराठवाडा; विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवलाय. मराठवाड्यात येथे कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी सध्या सुरू आहे. पण दोन-तीन दिवस मुळातच पाऊस पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.