गृहराज्यमंत्र्यांनी केली पानसरेंच्या खुन्याची पाठराखण...

गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक झालेल्या समीर गायकवाडला केवळ संशयाच्या बळावर अटक करण्यात आलीय, असं धक्कादायक वक्तव्य खुद्द गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केलंय. ते अकोल्यात बोलत होते. 

Updated: Oct 6, 2015, 04:55 PM IST
गृहराज्यमंत्र्यांनी केली पानसरेंच्या खुन्याची पाठराखण...  title=

अकोला : गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक झालेल्या समीर गायकवाडला केवळ संशयाच्या बळावर अटक करण्यात आलीय, असं धक्कादायक वक्तव्य खुद्द गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केलंय. ते अकोल्यात बोलत होते. 

अधिक वाचा - कुणाच्या मागणीवरून सनातनवर बंदी नाही - खडसे

अकोला इथल्या शासकीय विश्रामगृहावर गृहराज्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली... यावेळी ते बोलत होते. पानसरेंच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड विरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलंय. फोनवर रेकॉर्ड झालेल्या संभाषणावरून आणि संशयावरून केवळ गायकवाडला अटक करण्यात आलीय... पण, यामुळे तो खुनी असल्याचं स्पष्ट होत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

अधिक वाचा - 'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप!

कुणी चुकीचं वागत असल्यास त्याला पाठिशी घातलं जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. समीर गायकवाडच्या अटकेनंतर 'सनातन' या वादग्रस्त संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होतेय... याचबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रणजीत पाटील बोलत होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.