सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन सेना-भाजपमध्ये स्पर्धा

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांमध्ये आता सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन स्पर्धा सुरु झाल्याचं चित्र आहे. 

Updated: Apr 17, 2016, 11:10 AM IST
सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन सेना-भाजपमध्ये स्पर्धा title=

औरंगाबाद : सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात आता सामूहिक विवाह सोहळ्यांवरुन चढाओढ सुरु झाल्याचे चित्र आहे. 

 

शिवसेनेने पुढाकार घेत शनिवारी औरंगाबादमध्ये विविध धर्मांतील २४४ जोडप्यांची लग्न लावून दिली. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीही उपस्थिती लावली होती

त्यानंतर आज भाजपकडून जालनामध्ये ५५१ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय. सुमारे एक लाख व-हाड्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडाणार आहे. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्तेही उपस्थित रहाणार आहेत.