युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युती तुटल्याचं अतीव दुःख होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मिश्किलपणे हसत दिलीय. पुण्यामध्ये ते बोलत होते.

Updated: Jan 26, 2017, 08:36 PM IST
युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

पुणे : युती तुटल्याचं अतीव दुःख होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मिश्किलपणे हसत दिलीय. पुण्यामध्ये ते बोलत होते.

बोलताना राज्यातील सरकारचा पाठिंबा शिवसेनेनं काढला तर पाठिंबा देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता... 'चर्चेसाठी आले तर विचार करू' अशी गुगलीही पवारांनी टाकलीय.

उद्धव ठाकरेंनी मुंबईत गोरेगावच्या सभेत आज युती तुटल्याचं जाहीर केल्यानंतर उपरोधिक आणि खोचकपणे पवारांनी आपल्याला अतीव दु:ख होत असल्याचं म्हटलंय.