उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची तोडफोड

नगरविकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली.

Updated: Aug 23, 2016, 05:20 PM IST

उल्हासनगर : नगरविकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली.

तोडफोडीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे, महापौर आणि स्थायी समिती सभापतीही शिवसेनेचाच आहे.

पाहा व्हिडिओ