उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील सहायक उपायुक्त युवराज भदाने याना मंगळवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्या प्रिया गुप्ता यांनी महापालिकेत मारहाण केली होती. काल भदाने यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले.
भदाणे याच्यावरील विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलीय. आपल्या दिराची बदली करण्यासाठी उपायुक्तांनी २० हजारांची मागणी केल्याचा आरोप प्रिया गुप्ता यांनी केलाय होता.
यावरुन परस्परांविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला. मात्र, आंदोलन सुरु होते.