पुण्यासह ४ शहरांमध्ये पारा ८ अंशांखाली

शहरात सोमवारी थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. या मोसमातील सर्वांत नीचांकी ७.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची आज नोंद पुण्यात झाली. 

Updated: Dec 29, 2014, 07:31 PM IST
पुण्यासह ४ शहरांमध्ये पारा ८ अंशांखाली title=

पुणे : शहरात सोमवारी थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. या मोसमातील सर्वांत नीचांकी ७.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची आज नोंद पुण्यात झाली. 

पुण्यासह औरंगाबाद, अकोला, मालेगाव या शहरांतील तापमानही ८ अंशांखाली आले आहे. नाशिकचे तापमान ६.६ सर्वांत नीचांकी आहे.

पारा आणखी खाली घसल्याने सोमवारी पुणेकरांची या आठवड्याची सुरवात कुडकुडत झाली. पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या अनेकांनी वाढत्या थंडीच्या लाटेमुळे व्यायामाला सुटी देणे पसंत केलंय.

मुंबई- २१.३, सांताक्रुझ- १७.४, अलिबाग- १५.७, रत्नागिरी- १९.९, पणजी- १८.९,

जळगाव- ८.२, कोल्हापूर- १४.०, महाबळेश्वर- १०.६, मालेगाव- ७.८, नाशिक- ६.६

सांगली- १२.७, सोलापूर- १२.०, औरंगाबाद- ७.८, परभणी- ८.०, नागपूर- ६.१, वर्धा- ८.५. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.