नागपूर : केंद्रातल्या मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेनं घरचा आहेर दिला आहे. नागपुरात सुरू असलेल्या विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं.
अच्छे दिन आल्याचा गाजावाजा सरकार करतंय. पण प्रत्यक्षात ते अनुभवायला मिळत नाहीयत, अशी कडवट टीका यावेळी करण्यात आली. हिंदूंमुळं राजकीय संघटना आहेत, या संघटनांमुळे हिंदू नाही, याची आठवण करून देण्यात आली.
एवढंच नव्हे तर गोरक्षा, गंगा स्वच्छता आणि राममंदिर निर्माण या हिंदूंच्या तीन कळीच्या मुद्यांवर काहीच होताना दिसत नाही, असा भडीमारही यावेळी करण्यात आला. तीन दिवसांच्या या बैठकीत देश विदेशातून आलेले विहिंपचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत.