झी 24 तास वेब टीम, मुंबई
दादरमधल्या हिंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. हिंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाणार आहे. कित्येक वर्षांपासूनच्या या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळं ६ डिसेंबरला हे आंदोलन करणार असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. या आंदोलनात लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दादर स्टेशनचं नामांतर या विषयावर मोठ्या प्रमाणावर वाद विवाद झाले होते, राष्ट्रवादीने दादरचे नामांतर चैत्यभूमी करावं अशी मागणी केली होती. आता मात्र हिदूं मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती स्मारकासाठी मागणी करण्यात येणार आहे.