भारतासारख्या देशात राइट टू रिकॉल शक्य नाही, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले. जनचेतन यात्रेच्या निमित्ताने ते मुंबईत आलेल्या अडवाणी यांनी आज एका पत्रकार परिषदेत सरकारवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली.
मी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी सहमत आहे. भारतासारख्या मोठ्या देशात राइट टू रिकॉलसारखा पर्याय अस्थिरता निर्माण करू शकतो, असे अडवाणी यांनी सांगितले. आकाराने आणि लोकसंख्येने लहान असलेल्या देशातच राइट टू रिकॉल हा पर्यार आपल्याला पहावयास मिळेल. अन्य कुठेही नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, टीम अण्णा मात्र आपल्या मागणीवर कायम असून जनलोकपाल विधेयकानंतरचा लढा राइट टू रिकॉलसाठी असे टीम अण्णांनी या आधीच स्पष्ट केले आहे.