www.24taas.com, मुंबई
शिवसेना-भाजपच्या १४ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दिवेआगार सुवर्णगणेश मंदिर दरोड्याचा निषेध करण्यासाठी युतीच्य़ा आमदारांनी सभागृहात आरती केली होती. त्यामुळे या चौदा आमदरांना एक वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलंय.
मात्र हे निलंबन जास्त असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. निलंबन मागे घेण्याच्या मागणीला मनसेचाही पाठिंबा आहे. दुसरीकडे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची हमी देऊन हे निलंबन मागे घ्यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
शिवाय निलंबन मागे घेण्यासंदर्भात विधानसभाध्यक्षही अनुकूल असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे युतीच्या १४ आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.