मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार

मुंबईतील विद्याविहार परिसरात कोहिनूर हॉस्पिटलजवळ  सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊ झालेल्या अपघातात आठ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Oct 16, 2015, 08:31 PM IST
मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार  title=

मुंबई : कुर्ला परिसरात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागून 8 जणांचा मृत्यू झालाय... 

कुर्ला पश्चिमेकडील होली क्रॉस शाळेच्या समोरच्या सिटी किनारा नावाच्या हॉटेलमध्ये आज दुपारी ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका महिलेचा तसंच 8 पुरूषांचा समावेश आहे. त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

यातल्या 3 मृतदेहांची ओळख पटलेली आहे. यात ब्रॅन एन्थनी फर्नांडो या 20 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या घटनेनंतर जवळच्या शाळा कॉलेजेसमधील पालकांची राजावाडी रुग्णालयात गर्दी झालीय. 

तळमजला अधिक एक मजला असं या हॉटेलचं बांधकाम असून, तिथं चायनीज फास्ट फूड तयार केलं जातं.तर वरचा भाग लोकांना जेवण्यासाठी ठेवलेला होता. गॅस सिलेंडरमधील गॅसची गळती होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन अधिका-यांनी व्यक्त केलाय.... 

या आगीत हॉटेलमधील इलेक्ट्रिक वायर्स, लाकडी फर्निचरही जळून खाक झालं. जखमींना राजावाडी आणि भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.