मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर असताना मुंबईत भाजपनं मनसेला खिंडार पाडायला सुरुवात केलीय.
मुंबई महापालिकेतील मनसेचे ८ नगरसेवक संपर्कात असल्याचा भाजपने दावा केलाय. यापैंकी ४ नगरसेवकांना भाजपनं गटनेत्यांच्या विकासनिधीतून सव्वा कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करुन दिलाय.
यामध्ये,
संजय भालेराव - २५ लाख
भालचंद्र आंबोरे - २५ लाख
ईश्वर तायडे - २५ लाख
प्रकाश दरेकर - ५० लाख
तसंच, सेनेनंही मनसेच्या दिलीप मामा लांडे यांनाही ५० लाखांचा निधी महापौर फंडातून उपलब्ध करुन दिलाय.
त्यामुळे, २०१७ च्या महापालिका निवडणूकीचं बिगुल वाजण्याआधीच मुंबई महापालिकेत पक्षांतरांच्या हालचालींना वेग आलाय.