www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईतील ट्रेनी महिला फोटोग्राफर सामूहिक बलात्कारानंतर देशात तीव्र पसदात उमलटलेत. सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली. तर किमान दोघांना तर फाशी द्या अशी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मागणी केली असतानाच पोलिसांचा खबऱ्याच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी निघाल्याने पोलीसही चक्रावलेत.
सामूहिक बलात्कारानंतर सारी मुंबई हादरून गेली. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्केच जाही करण्यात आले. माहिती मिळण्यास उशीर होत होता. त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले. त्यासाठी क्राइम ब्रॅन्चच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आपापल्या खबऱ्यांना कामाला लावले. एका हवालदाराने तर बलात्कारात भाग घेणाऱ्या एका आरोपीशी संपर्क साधून त्याला महालक्ष्मीच्या शक्ती मीलमधील संशयितांची माहिती मिळविण्यास सांगितले; परंतु आता ज्या खबऱ्याला माहिती मिळविण्यास सांगण्यात आले होते तोच खबऱ्या बलात्कारप्रकरणाती प्रमुख आरोपी आहे. त्याचे नाव कासीम असल्याचे उघड झाले आहे.
मोहम्मद कासीम मोहम्मद शेख ऊर्फ बंगाली (२०) असे या पोलिसांच्या खबऱ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध आग्रीपाडा आणि ताडदेव पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी आदी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. कासीम हा आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरातल्या झोपडपट्टीत राहतो. आग्रीपाडा पोलिसांचा आरोपी असलेला कासीम पोलिसांना खबरी देण्याचेही काम करीत होता.
बलात्काराचा तपास तात्काळ लागावा यासाठी एका पोलीस हवालदाराने शक्ती मिलमधील बलात्काराकांड उघडकीस आल्यानंतर त्याच रात्री कासीमला मोबाईलवर संपर्क साधला. कासीम रेप केस में मुझे तेरी मदत चाहिए, आरोपी को पकडना है, मुझे आके मिलो. असे बोलून त्या हवालदाराने फोन ठेवून दिला; परंतु या हवालदाराने फोन केल्यामुळे कासीम घाबरला आणि तो पलायन करण्याच्या बेतात होता.
पोलीस हवालदाराचा फोन आल्यामुळे कासीम घाबरला. तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यामुळेच त्याच्याविरुद्धचा संशय अधिकच बळावला आणि क्राइम ब्रॅन्चच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. मुंबई क्राइम ब्रॅन्च युनिट क्र. ३च्या अधिकाऱ्यांनी नायर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील आवारात झोपलेल्या कासीमला ताब्यात घेतले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.