मुंबई : आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल विद्यासागर राव सीबीआयला अशोक चव्हाणांच्याविरोधात फौजदारी खटला भरणाची परवानगी देण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी यासंदर्भात मंत्रिमंडळाकडे मत मागवले होते. यावर मंत्रिमंडळानं फौजदारी खटला भरण्यास एकमतानं सहमती दर्शवली आहे.
आता राज्यपाल सीबीआयला खटला भरण्याची परवानगी देण्याबाबत केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अशोक चव्हाणांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. दरम्यान भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीय.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपामुळंच सीबीआय अशोक चव्हाणांवर फौजदारी खटला भरू शकत नव्हती असा आरोप सोमय्या यांनी केलाय. तर दुसरीकडे भादप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय.