आता सेना-मनसेत महापालिकेच्या अॅपवरुन कुरघोडीचं राजकारण

(दिनेश दुखंडे, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेच्या अॅप सुविधेचं आज महापौर सुनील प्रभू यांच्याहस्ते लोकार्पण झालं. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत होत असलेल्या या सोहळ्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षानं महापौरांआधीच लोकार्पणाची आपली हौस भागवली आणि सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

Updated: Aug 2, 2014, 11:45 PM IST
आता सेना-मनसेत महापालिकेच्या अॅपवरुन कुरघोडीचं राजकारण title=

मुंबई: (दिनेश दुखंडे, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेच्या अॅप सुविधेचं आज महापौर सुनील प्रभू यांच्याहस्ते लोकार्पण झालं. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत होत असलेल्या या सोहळ्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षानं महापौरांआधीच लोकार्पणाची आपली हौस भागवली आणि सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

एकमेकांना भरवले जात असलेले हे पेढे कुठल्या निवडणुकीतल्या विजयाचे नाहीत, तर मुंबई महापालिकेच्या अॅप सुविधेच्या शुभारभांसाठी तोंड गोड केलं जातंय. मात्र हा अधिकृत सोहळा नाही... ही साजरी होतेय विरोधी पक्षांची यशस्वी खेळी... मुंबई महापालिकेच्या अॅप सुविधेच्या शुभारंभाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं लाभलेलं औचित्य विरोधी पक्षाला इतकं खटकलं की त्यांनी सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवायचं ठरवलं.. त्यानुसार विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आपल्या मोबाईल फोनवर चालाखीनं आधीच अॅप मिळवलं... अधिकृत कार्यक्रमाच्या एक तास आधीच विरोधी पक्षांनी सुविधेचा शुभारंभ करुन सत्ताधारी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला...

विरोधी पक्षाच्या या खेळीनंतर महापौर सुनील प्रभू यांच्याहस्ते अॅप सुविधेचं अधिकृत लोकार्पण पार पडलं... यावेळी विरोधी पक्षाच्या कृतीची महापौरांनी खिल्ली उडवली.

वाय-फाय असो वा अॅप या नवनवीन सुविधा नागरिकांना देण्यावरून सेना-मनसेत रंगणारा वाद मात्र तोच जुना आहे या श्रेयवादात मुंबईकरांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हेही ते सोयीस्कररित्या विसरतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.