www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
म्हाडाच्या मुंबई आणि विरारमधील 2641 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु होतेय. दुपारी 2 वाजल्यापासून ही नोंदणी सुरु होणार आहे. या नोंदणीनंतरच पुढे घरासाठी अर्ज करता येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे संध्याकाळी सहापर्यंत ही नोंदणी इच्छुकांना करता येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलपासून अर्ज विक्री करण्यात येईल. 24 एप्रिल ते 16 मेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
सोडतीबाबात महत्त्वाच्या गोष्टी
* जाहीरात प्रसिद्धी - २४ किंवा २५ फेब्रुवारी
* अर्ज विक्री - २४ एप्रिल ते १५ मे
* अर्ज स्वीकारण्याची मुदत - २४ एप्रिल ते १६ मेपर्यंत अॅक्सिस बँकेत स्वीकारणार
* नोंदणी शुल्क - २०० रुपये
विभाग, घरे, उत्पन्न गट, क्षेत्रफळ, किंमत
* मानखुर्द - २३९ - अत्यल्प - २६९ चौ. फूट - ५ लाख ७५ हजार
* कुर्ला - २०७ - अत्यल्प - २६९चौ. फूट - १५ लाख
* प्रतीक्षानगर - ५६ - मध्यम गट - ४३७ चौ.फूट - किंमत निश्चित होणे बाकी
* मागाठाणे - ६२ - अत्यल्प गट - २६९ चौ. फूट - १५ लाख ६२ हजार
* शैलेंद्रनगर - ८६ - उच्च गट - ८७१ चौ. फूट - ९५ लाख
* सांताक्रुझ - ५१ - उच्च गट - ७३९ चौ. फूट - ७४ लाख
* तुंगा पवई - ९ - अल्प गट - ३०५ चौ. फूट - ४८ लाख ८६ हजार
* तुंगा पवई - १०८ - उच्च गट - ४७६ चौ. फूट - ७५ लाख २२ हजार
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.