मुंबईत बॉम्बची अफवा पसरवणार्‍याला अटक

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेल्वे नियंत्रण कक्षात सातत्याने फोन करून बॉम्ब असल्याची अफवा पसरवणार्‍या धनवीन बरोटा (४०) याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2013, 10:22 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेल्वे नियंत्रण कक्षात सातत्याने फोन करून बॉम्ब असल्याची अफवा पसरवणार्‍या धनवीन बरोटा (४०) याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरील नियत्रंण कक्षाला धनवीन हा गेल्या महिन्याभरापासून सातत्याने फोन करत होता. कुर्ला येथे बॉम्ब असल्याची खोटी माहिती देत होता. त्या फोनची दखल घेऊन त्याबाबत टर्मिनस परिसरात पोलीस झडती घेत होते.
महिन्याभरात चार ते पाच वेळा फोन करुन धनवीनने बॉम्बची अफवा पसरवली होती. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक स्थापन केले. या पथकाने काढलेल्या माहितीत टिळकनगर परिसरातीलच एका पीसीओवरुन हे कॉल येत असल्याचे त्यांना समजले.
पोलिसांनी त्यानुसार चार दिवस या पीसीओ बुथवर पाळत ठेवली. पोलिसांनी व्यवसायिक असलेल्या बरोटाला सोमवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता केवळ अफवा पसरवण्यासाठी आपण हे फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.