मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'ला ६० हजारांचा गंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएच्या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन चोरी करण्यात आली आहे. बँक एटीएमचा पिननंबर मिळवून, मुख्यमंत्र्यांच्या पीएला ६० हजारांचा गंडा लावण्यात आला आहे.

Updated: May 13, 2015, 11:29 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'ला ६० हजारांचा गंडा title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएच्या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन चोरी करण्यात आली आहे. बँक एटीएमचा पिननंबर मिळवून, मुख्यमंत्र्यांच्या पीएला ६० हजारांचा गंडा लावण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचे पीए विवेक बिमनवार यांना आज तोतया बँक अधिकाऱ्यानी फोन केला आणि त्यांना एटीएम पिन मागवला. बिमनवार यांनी एटीएम पिन त्या बँक अधिकाऱ्यांना सांगितलाही. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल 60 हजार रुपये गायब झाले.
 
ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांचा सुळसुळाट
 ऑनलाईन गंडा एकट्या मुख्यमंत्र्यांच्या पीएलाच घातला असं नाही, तर आतापर्यंत महाराष्ट्रात शेकडो लोकांना असा गंडा घातला गेला आहे. गेल्या वर्षभरात देशात ४० हजार फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे तब्बल लोक ७०० कोटींना बुडाले आहेत. या गुन्हेगारांच्या टार्गेटवर महाराष्ट्र नंबर वन आहे. 

कोणतीही बँक आपला एटीएम पिन ग्राहकाला कधीच विचारत नाही, आपला पिन नंबर कुणीही विचारला तर सांगू नये अशा सूचना घरात देणे महत्वाचे आहे, अनेक वेळा घरातील मुलांनाही हा पिन नंबर फोन करून विचारण्यात येतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.