भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

एकीकडे शिवसेना-भाजप युतीबद्दल संभ्रम असताना दुसरीकडे मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार आहे. त्यासाठी

Updated: Jan 21, 2017, 11:34 AM IST
भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार title=

मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजप युतीबद्दल संभ्रम असताना दुसरीकडे मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार आहे. त्यासाठी

निवडणूक समितीची तीन दिवस 20 तास बैठक झाली. काल रात्री उशिरा तीन वाजता ही बैठक संपली. त्यामध्ये वॉर्डनिहाय चर्चा करून 512 उमेदवारांची यादी तयार करण्यात आलीय. अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना देण्यात आलेत.
 
भाजपकडे अडीच हजार इच्छुकांचे अर्ज आले होते, त्यात पहिली चाळण लावून 1769 यादी करण्यात आली त्या नावांचा विचार करून समितीने 512 नावांची यादी तयार केली. प्रत्येक वॉर्डासाठी 2 ते 3 नावं या प्रमाणे ही यादी तयार आहे. युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी होईल.