मुंबई: महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळानं होरपळतोय म्हणून त्याच्या मदतीला टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणे धावून आलाय. त्यानं सोमवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेवून पाच लाखांच्या मदतीचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय.
"माझी आजी ९० वर्षांची असून ती आजही शेती करते", हे सांगत श्रीलंकेच्या दौऱ्यावर असतांनाच दुष्काळाच्या बातम्या वाचून आपणही काही मदत करावी हा निर्णय घेतला होता, असं अजिंक्य म्हणाला.
आणखी वाचा - 'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे संकट असून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या कलाकारांनी मोहीम सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही दुष्काळग्रस्तांना कोट्यावधीची मदत करण्याची दिली आहे. पण अद्याप एकाही क्रिकेटपटूनं दुष्काळग्रस्तांना मदत दिली नव्हती. मैदानात शांत आणि संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेनं आता मैदानाबाहेरही नवा आदर्श निर्माण केला आहे.
आणखी वाचा - शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे
पाणीटंचाईची समस्या असलेल्या ग्रामीण भागात शेतीसाठी जलयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. अजिंक्यनं दिलेल्या निधीचा वापर या योजनेसाठी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.