मुंबई : दिवाळीत पुढील काही दिवस मुंबईभर जमाव बंदीचे आदेश मुंबई पोलीसांनी दिलेत. त्यामुळे मुंबईकरांनो दिवाळी साजरी करताना जरा जपून रहावे लागणार आहे.
तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर फटाके फोडू नये याकरता संपूर्ण मुंबईभर गस्ती वाढवली जाणार आहे. फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके वाजवण्याची रात्री १२ पर्यंत वेळ शिथिल करण्यात आली आहे.
लोकांना अडथळा निर्माण होईल किंवा इजा होईल अशा ठिकाणी फटाके वाजवायला मुंबई पोलिसांनी बंदी घातलीये. अशा घटना घडत असल्यास १०० नंबरवर तात्काळ फोन करावा मदत पथक रवाना केले जाईल, अशा सूचना मुंबई पोलिसांनी केल्यात.