राज्यात साथीच्या रोगराईचं थैमान

ऐन पावसाळ्यात राज्यात रोगराईचं थैमान सुरु झालय. मुंबईत साथीच्या आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ६०० जणांना लागण झालीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 11, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
ऐन पावसाळ्यात राज्यात रोगराईचं थैमान सुरु झालय. मुंबईत साथीच्या आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ६०० जणांना लागण झालीये.
नाशिकमध्येही तापाचे रुग्ण वाढले असून सुमारे ९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. दूषित पाणी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे यात भर पडलीये.
तर ऐन पावसाळ्यात नाशिक शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. शहरात तापाचे रुग्ण वाढत चालले असून, डेंग्यूनेही डोकं वर काढलय.

शहराच्या विविध भागात ९ जणांना डेंग्यूची लागण झालीय. तर मलेरियाचे २ रुग्ण आढळलेत. रुग्णाची संख्या वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र सुस्त आहे.
शहरात घंटागाडीच्या माध्यमातून नियमित कचरा उचलला जात नसल्यानं रोगराई पसरत चाललीय. याच विषयावर बोलावण्यात आलेली आजची स्थायी समितीची महत्त्वाची बैठक केवळ आयुक्त गैरहजर राहिल्यामुळे होऊ शकली नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.