www.24taas.com, झी मीडिया, भाईंदर
राज्यभर आधार कार्ड नोंदणी होत असताना भाईंदरमध्ये बनावट आधारकार्ड बनत असल्याचं समोर आलंय. ५०० रूपयात बोगस आधारकार्ड तयार केलं जात होतं.
बांगलादेशींना हे आधार कार्ड दिलं जात होतं. भाईंदरच्या सेकंडरी हायस्कूलमध्ये कारवाईत आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलंय. आधारकार्ड तयार करणा-या नूरआलम रमझान शेख या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांच्या आधारकार्डच्या स्लीपही जप्त केल्या आहेत. याआधीही त्याला अटक झाली होती. मात्र १५००० रूपयांच्या जामिनावर त्याची सुटका झाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.