मुंबई: बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेल्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. राज यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवलाय.
शरद पवार पुरस्कारावरून गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करत सरकारलाही टार्गेट केलंय. भाजपमध्येच छुपी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी लगावलाय.
राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे-
- बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, तांडव करेल या महाराष्ट्रात
- या वादाला भाजपमधील काही लोकं देखील जबाबदार आहेत
- पवारांची फूस आहे म्हणूनच आव्हाड बोलतात
- यांना फक्त जातीचं राजकारण करायचं आहे
- कुसुमाग्रज आणि विं.दा.करंदरीकर यांच्याकडून नेमाडेंनी काही तरी शिकावं
- ज्ञानपीठ मिळाल्यानंतर नेमाडेंनी कसं वागावं याचे धडे घ्यावेत
- ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्याने पवारांचे राजकारण सुरु
- पवारांनी यापूर्वी पुरंदरेंचा 2-3 वेळा सत्कार का केला? त्यावेळी पुरंदेरेंचा इतिहास चुकीचा वाटला नाही का? - राज ठाकरे
- पवारांचे गलिच्छ राजकारण, बाबासाहेब हे निमित्त
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबतीत शरद पवार गलिच्छ राजकारण करीत आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.