महायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात

 महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय. 

Updated: Sep 18, 2014, 06:49 PM IST
महायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात title=

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय. 

अमित शाह यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचा सूर काहीसा नरमलेला दिसतोय. युती टिकवण्यासाठी दोन-दोन पावलं दोघांनी पुढं येण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. अमित शाह यांच्या आवाहनानंतर शिवसेनेचा सूर काहीसा नरमलेला दिसतोय.

दो कदम हम भी चले, दो कदम आप भी चलो, असं म्हणत संजय राऊतांनीही सुरात सूर मिळवलाय. त्याचवेळी युती टीकावी, हीच पक्षप्रमुखांची इच्छा असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. पण त्याचवेळी निवडून येणा-या जागांचा निकष काय, असा प्रश्नही त्यांनी भाजपला विचारलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.