मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत आणि सेवानिवृत्तीचे वय ६० करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आश्वासन राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेला दिले आहे.
राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. या बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 18 मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
या मागण्यांमध्ये ५ दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, १ जानेवारी २०१५ पासून तातडीने ६ टक्के महागाई भत्ता वाढ, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना २ वर्षांची बालसंगोपन रजा, आदींचा समावेश होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.