`म्हाडा`ची मास्टर लिस्ट नोव्हेंबरमध्ये

धोकादायक इमारतींमधून सुरक्षिततेसाठी किंवा ढासळलेल्या इमारतींतून संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलेल्या रहिवाशांपैकी हजारो रहिवासी २५-३० वर्षं संक्रमण शिबिरात राहत आहेत. या लोकांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी गेली काही वर्षं मास्टर लिस्ट तयार केली जात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2012, 08:55 AM IST

www.24taas.com, मुंबई
धोकादायक इमारतींमधून सुरक्षिततेसाठी किंवा ढासळलेल्या इमारतींतून संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलेल्या रहिवाशांपैकी हजारो रहिवासी २५-३० वर्षं संक्रमण शिबिरात राहत आहेत. या लोकांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी गेली काही वर्षं मास्टर लिस्ट तयार केली जात आहे.
येत्या नोव्हेंबरपर्यंत या मास्टर लिस्टचं काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मोहन ठोंबरे यांनी दिली आहे. मास्टर लिस्टसाठी अर्ज केलेल्या ७ हजार अर्जदारांपैकी ४१०० अर्जदारांची छाननी आणि सुनावणी आतापर्यंत पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मास्टर लिस्टसाठी ७,००० अर्ज आले असून यांतील ४१०० अर्जदारांची छाननी, सुनावणी पूर्ण झाली आहे. संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या घुसखोरीमुळे मास्टर लिस्ट बनवण्याची गरज निर्माण झाली. या मास्टर लिस्टसाठी म्हाडाने १९ हजार संक्रमण शिबिरार्थींकडून अर्ज मागितले, पण त्यातील केवळ ७ हजार लोकांनीच अर्ज पाठवले. या ७००० अर्जदारांची पात्रता तपासण्यात येत आहे.हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.