मुंबई : हक्काची घरे मिळावीत यासाठी गिरणी कामगारांनी आता उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येत्या मंगळवारपासून मुंबईतील सर्व गिरणी कामगार संघटना मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर उपोषणासाठी बसणार आहेत.
घरे देण्याबाबत काँग्रेस आघाडी सरकारने निराशा केलीच. पण फ़डणवीस सरकारनेही पाठ फिरवल्याची भावना गिरणी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळच्या सभागृहात आश्वासन देऊनही गिरणी कामागरांच्या घरांच्या किंमती ठरवण्याबाबत साधा निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत किती गंभीर असणार असा प्रश्न गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी उपस्थित केला आहे.