गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित

गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत. गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या घराचं क्षेत्रफळ 225 चौरस फूट एवढं आहे. तर एमएमआरडीएच्या घराची किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली असून या घराचं क्षेत्रफळ 320 चौरस फूट असणार आहे.

Updated: Apr 12, 2016, 10:09 PM IST
गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित  title=

मुंबई : गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत. गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या घराचं क्षेत्रफळ 225 चौरस फूट एवढं आहे. तर एमएमआरडीएच्या घराची किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली असून या घराचं क्षेत्रफळ 320 चौरस फूट असणार आहे.

गिरणीच्या जमिनीवरील 2 हजार 634 घरं आणि एमएमआऱडीएच्या 2 हजार 418 घरांसाठी लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. 

पाहूयात कोणत्या परिसरात किती घरं उपलब्ध होणार आहे

- सेंच्युरी मिल 1430 घर
- प्रकाश कॉटन मिल 562 घर
- भारत मिल 188
- रुबी मिल 47
- जुबली मिल 127
- वेस्टर्न इंडिया मिल 250 घर
- मुंबईत 2634 घर
- एमएमआर रिजन 2418 घर
   
   एकूण 5052 घर