मुंबई : मुंबईत उपचार करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका दाम्पत्याला कटू अनुभवाबरोबरच गोड अनुभव आला. केईएम रुग्णालयाकडून मुलावर उपचार करण्यास उशिर झाल्याने मुलाची दृष्टी जाण्याच्या भीतीने हे दाम्पत्य चिंतेत पडले. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, मालाडमधील डॉ. अग्रवाल देवदूत बनून धाऊन आलेत. त्यांनी मोफत उपचार करुन त्यांच्या मुलाला दृष्टी दिली आणि कुटुंबाचा हिरावलेला आनंद परत मिळून दिला.
गोरखपूर येथे राहणारे अभिषेक सिंह यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला. घरात आनंदी वातावरण होते. मात्र, काही तासातच त्या मुलीचा मृत्यू झाला. घरातील आनंद हिरावून गेला. आम्हाला बाळाची गरज होती. सात महिन्यांपूर्वी आमच्या घरात मुलाचा जन्म झाला. त्यामुळे घरात मोठा आनंद माहोल होता. माझ्या दु:खी पत्नीला नविन जीवन मिळाले. मुलाचे नाव आर्यन ठेवले. आर्यनची तब्बेत दिवसागणिक बिघडली. त्यानंतर घरातील आनंद लोप पावला.
आर्यलना सर्दी-ताप होत असे. तसेच श्वास घेताना त्रास होत होता. त्यानंतर त्याला आयसीयुत दाखल करावे लागले. त्यावेळी समजले की त्याच्या हृदयाला चार एमएमचे छिद्र असल्याचे समजले. त्याच्यावर उपचार करण्यापाई त्याच्या डोळ्यांकडे लक्ष गेलेच नाही. लहानपणीच आर्यनला मोतीबिंदूचा त्रास होता. त्याला दिसत नव्हते. त्यामुळे अभिषेक आणि त्याची पत्नी सरोज खूपच हादरून गेलीत. काय करायचे या विचारात त्यांनी मुलाला थेट मुंबईला आणले. केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तात्काळ उपचार झाले नाहीत. यात एक महिना गेला. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे कांदीवली येथे एका झोपडपट्टीत हे कुटुंब राहू लागले.
अभिषेक भिंतीना रंग करण्याचे काम करतो. त्यामुळे त्याचे हातावर पोट होते. मुलाचा उपचार कसा करायचा, हा त्याला प्रश्न सतावत होता. आधीच मुलगी गेल्याने त्यांच्यावर संकट कोसळले होते. आता मुलाच्या काळजीपोटी त्याला काहीही सूचत नव्हते. एके दिवशी अभिषेकच्या मित्राने त्याला मालाडमधील डॉ. श्याम अग्रवाल यांच्या आय केअर हॉस्पीटलला मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. तिथे गेल्यावर त्यांने प्रथम डॉक्टरांना आपली परिस्थिती सांगितली. माझ्याजवळ उपचारासाठी पैसे नाहीत. उपचार झाले नाहीत तर मुलाची दृष्टी जाईल. त्यामुळे डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची तातडीने गरज होती. डॉ. अग्रवाल यांनी मुलावर मोफत सर्व उपचार केले आणि आर्यनला दृष्टी मिळाली. डॉ. अग्रवाल यांच्या रुपाने आम्हाला देव मिळाला, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्यांनी व्यक्त केली.
मुलाला दृष्टी मिळाल्यानंतर आता केईएममध्ये त्याच्या हृदयावर उपचार कऱण्यात येणार आहेत. पाच महिन्यांत तीन शहर भटकल्यानंतर मुलावर मालाड येथे उपचार झाल्याने अभिषेक दाम्पत्याच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.