मुंबईत आणखी एक हिट अॅंड रन, सामान्यांच्या संवेदना मेल्यात का?

मुंबईतल्या गोरेगावमध्ये 'हिट अँड रन'चं एक प्रकरण समोर आलं आहे. कामावरुन घरी निघालेल्या एका तरुणीला भरधाव गाडीनं धडक दिल्यानं ती गंभीररित्या जखमी झाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

Updated: May 18, 2015, 07:29 PM IST
मुंबईत आणखी एक हिट अॅंड रन, सामान्यांच्या संवेदना मेल्यात का? title=

मुंबई : मुंबईतल्या गोरेगावमध्ये 'हिट अँड रन'चं एक प्रकरण समोर आलं आहे. कामावरुन घरी निघालेल्या एका तरुणीला भरधाव गाडीनं धडक दिल्यानं ती गंभीररित्या जखमी झाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी रात्री ८ च्या सुमारास रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहणाऱ्या २२ वर्षीय अर्चना पांड्या हिला एका भरधाव गाडीनं धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अर्चनाला त्याच अवस्थेत तिथं सोडून गाडीचालक तिथून पळून गेला. त्यामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते, मात्र कोणीही अर्चनाला मदत करण्याची तसदी घेतली नाही. जर अर्चनाला वेळीच दवाखान्यात दाखल केलं असतं तर तिचे प्राण कदाचित वाचू शकले असते. विषेश बाब म्हणजे वनराई पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. 

गोरेगावच्या ऑफिसमधून अंधेरीतील घरी जाण्यासाठी रिक्षा पकडताना तिला अपघात झाला. चार दिवसांपूर्वीच अर्चना टीसीएस कंपनीत रुजू झाली होती. अपघात झाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे फुटेज तपासले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.