नववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा

२०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय. 

Updated: Jan 1, 2016, 12:17 PM IST
नववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा  title=

मुंबई : २०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय. 

कायदे मोडणाऱ्या वाहतूक चालकांवर कारवाई करीत यंदा पोलिसांनी तब्बल ५ लाख ६३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केलाय. 

तर तब्बल ७०५ तलिरामांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षीपेक्षा दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येतही यंदा चांगलीच वाढ झालेली दिसून आलीय. यंदा... 
रॅश ड्रायव्हिंग - ५९
नो पार्किंग - ११८५ 
हेलमेटशिवाय टू व्हिलर चालवणे - १९०६ 
मद्य पिऊन गाडी चालवणे - ७०५

अशी कारवाई करत पोलिसांनी तब्बल ५,६३,९०० रुपयांची रक्कम वसूल केलीय.