मुंबई : मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यावरून हे किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३ अंशांनी खाली घसरलंय. मुंबईचा पारा बुधवारी १६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने, खानदेशसह विदर्भात आलेली थंडीची लाट कायम आहे, आता मुंबईदेखील गारठली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. मुंबईचे किमान तापमानदेखील ३ अंशानी खाली घसरले असून, मुंबईकरांना एका दिवसातच हुडहुडी भरली आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिकला ७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
दिनांक | सांताक्रुझ | कुलाबा
४ जानेवारी | १६.५ अंश सेल्सिअस | २० अंश सेल्सिअस
५ जानेवारी | २०.४ अंश सेल्सिअस | २२.६ अंश सेल्सिअस
६ जानेवारी | १८.२ अंश सेल्सिअस | २१.१० अंश सेल्सिअस
७ जानेवारी | १६.५अंश सेल्सिअस | १९.८ अंश सेल्सिअस
८ जानेवारी | १३.९ अंश सेल्सिअस |१८.१ अंश सेल्सिअस
मुंबईचं मागील पाच दिवसांचं तापमान राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणे १०.३,
जळगाव ७.८,
मालेगाव ९.७,
नाशिक ७,
उस्मानाबाद १०.९,
औरंगाबाद ११.४,
परभणी ११.८,
नांदेड १०.५,
अकोला ९.५,
अमरावती ११.४,
बुलढाणा १०.९,
चंद्रपूर ११.९,
नागपूर ८.७,
यवतमाळ ९
मुंबईचे किमान तापमान खालावल्याने रात्रीसह दिवसादेखील गारवा पडू लागला आहे, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.
पश्चिम बंगालवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि अवकाळी पावसामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली होती, आणि मुंबईच्या किमान तापमानासह कमाल तापमानातही वाढ झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.