मुंबई: मुंबईची मान आता आणखी उंचावणार आहे. कारण शिवाजी पार्कवर लवकरच देशातला सगळ्यात मोठा भारताचा तिरंगा डौलानं फडकणार आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. त्यासाठी शेवाळे यांनी फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव त्यांनी मुंबई हेरिटेज समितीकडे सादर केलाय.
शिवाजी पार्कवरील हा तिरंगा 74 मीटरचा म्हणजेच 240 फूटाचा असेल. जो वांद्रे वरळी सी लिंक इथूनही दिसेल. यासाठी जवळपास 50 लाख खर्च अपेक्षित आहे. येत्या महाराष्ट्र दिनी हा तिरंगा शिवाजी पार्कवर फडकेल असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलाय.
सध्या सगळ्यात मोठा तिरंगा नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर फडकत आहे.