मुंबई : सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वेची ओव्हर हेडवायर लागून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नाहूर-कांजूर परिसरात घडली.
नाहूर-कांजूर परिसरात साहिल इसवलकर हा सेल्फी काढण्यासाठी मालगाडीत चढला. त्यानंतर त्याने मोबाईने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याचा ओव्हर हेडवायरशी संपर्क याला. विजेच्या धक्क्याने साहिल जागीच कोसळला. त्याच्या मित्रांनी तात्काळ मदत केली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
साहिल हा इयत्ता नवित शिकत होता. शाळा परीक्षा संपल्याने साहिल आपल्या मित्रासोबत नाहूर जवळ असलेल्या रेल्वे सिमेंटयार्ड परिसरात खेळत होता. त्याठिकाणी पार्क केलेल्या माल गाड्यांवर फोटो काढण्यासाठी साहिल रेल्वेत चढला आणि सेल्फी काढत होता. साहिलच्या अचानक जाण्याने कांजूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिनाभरतील ही दुसरी घटना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.