आता चैत्र आणि माघी एकादशीलाही विठुरायाचं 24 तास दर्शन

मुख्यमंत्र्यांनी चैत्र आणि माघी एकादशीला भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची २४ तास परवानगी दिली आहे. 

Updated: May 21, 2015, 10:38 AM IST
आता चैत्र आणि माघी एकादशीलाही विठुरायाचं 24 तास दर्शन title=

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी चैत्र आणि माघी एकादशीला भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची २४ तास परवानगी दिली आहे. 

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी खुला असे. याच प्रमाणे चैत्र आणि माघी यात्रेसाठीही विठुरायाचे २४ तास दर्शन खुलं व्हावं, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. 

विठुरायाच्या दर्शनाला देशभरातील विविध भागातून भाविक आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या चार मोठ्या यात्रेसाठी पंढरपुरात येतात. मात्र चैत्री आणि माघी यात्रेला मदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहत नसल्यानं लाखो भाविकांना रात्रभर दर्शन रांगेत ताटकळत राहावं लागतं. ही बाब मंदिर समितीच्या निदर्शनास आणल्यावर मंदिर समिती अध्यक्ष आण्णा डांगे यांनी असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 

यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी देत भाविकांच्या अनेक वर्षाच्या मागणीचा मान ठेवत भाविकांचा त्रास कमी केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.