मुंबई : ४ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग पुन्हा जुळून येणार असल्याची माहिती मिळतेय. स्वतः मोदी यांनी राज ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलंय. गेल्या रविवारी नीट परिक्षेसंदर्भात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी हे निमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.
जून महिन्याच्या मध्यावर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा होऊ शकते अशी महिती सूत्रांकडून मिळतेय. बुधवारपासून राज परदेश दौ-यावर आहेत. ५ जून ला मुंबईत परततील. त्यानंतर १४ जून ला त्यांचा वाढदिवस आहे. या कार्यक्रमातून मोकळे झाल्यानंतर ते मोदींना भेटू शकतात अशी शक्यता आहे.
२०१२ साली राज ठाकरे यांनी गुजरात दौरा केला होता. मोदींच्या विकासकामाचे कौतुक केले होते. तसेच मोदी हे पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार असल्याची सर्वप्रथम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांनी मोदी यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दर्शवला होता. आता सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेनं भाजपवर टीका सुरु ठेवल्यानं राज ठाकरे यांचं महत्त्व वाढवण्याची खेळी केली जातेय.