पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण होणार आहे.

Updated: Aug 16, 2014, 09:49 AM IST
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर... title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण होणार आहे.

भारतातील सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आणि कोलकाता वर्गातील पहिली विनाशिका आयएनएस कोलकाता आज नौदलाच्या ताफ्यात आज दाखल होणार आहे. या कार्यक्रमात संरक्षण मंत्री अरुण जेटलींसह नौदल प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकतारी उपस्थित राहणार आहेत. 75000 टन वजनाची ही युद्धनौका स्टेल्थ तंत्रज्ञानानं बळकट करण्यात आली असून 300 किमीपर्यंत मारा करु शकणारी ब्राम्होस क्षेपाणस्त्रे या युद्धनौकेवर आहेत. ही नौका आज पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. 

‘जेएनपीटी’त दोन महत्त्वाचे प्रकल्प.. 
त्यानंतर मोदी नवी मुंबईतील बंदर जोडणी प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. जेनपीटी येथे सुरु होणाऱ्या दोन महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे. सुमारे 1900 कोटी रुपये खर्चाचा पोर्ट कनेक्टिव्हिटी महामार्ग प्रकल्प आणि जेएनपीटी परिसरात 277 एकर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्राचा प्रकल्प या दोन्हींचं भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. 
दरम्यान, प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के योजनेंतर्गत पर्यायी जमिन देण्याची घोषणाही ते यावेळी करणार आहेत. यामुळेच मोदींच्या या दौऱ्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

काय आहे पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्प पाहूयात...  
* हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिडको, JNPTचा संयुक्त प्रकल्प आहे.
* पोर्ट ट्रस्ट मुंबई गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-आग्रा,एक्स्प्रेस हायवेला जोडणार
* 1923 कोटी रुपये खर्चुन हा प्रकल्प उभारण्यात येतोय.
* या प्रकल्पाचं काम 2017 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.